कुरूंदवाड (प्रतिनिधी) :  शांतीचा आणि धार्मिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या महंमद पैगंबर यांची जयंती कुरूंदवाड शहर आणि परिसरात महाप्रसाद, दूध, सरबत, बुंदीचे वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

कुरुंदवाडमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बागवान फ्रेंड सर्कलतर्फे सपोनि. बालाजी भांगे, अमित पाटील, जवाहर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख वैभव उगळे यांच्या हस्ते मोहमेडन ट्रस्टचे अध्यक्ष हाजी अल्ताफ बागवान, नगरसेवक उदय डांगे, जवाहर पाटील, माजी उपनगराध्यक्ष लियाकत बागवान यांच्या हस्ते बुंदी आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तर मंगळवारी रात्री कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लब्बेक बहुउद्देशीय संस्थेतर्फे सद्दाम तहसीलदार, इम्रान बाणदार,पपू बागवान,जावेद मुल्ला यांच्या हस्ते खिरकुरमा आणि दूधाचे वाटप करण्यात आले. तसेच मोमीन मोहल्ला येथे सरबत आणि दुध वाटप तर  मोमीन मोहल्ला येथे अन्नदान करण्यात आले.