Breaking News

 

 

रवींद्र आपटे यांचं ध्यासपर्व म्हणजे तरुणांसाठी ‘गीताई’च : एन. डी. पाटील

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कुठलाही मनुष्‍य ध्‍येय, निष्‍ठा आणि चारित्र्य याच्या जोरावर आपल्‍याला हवे ते साध्‍य करु शकतो असा संदेश गोकुळ दूध संघाचे अध्‍यक्ष रविंद्र आपटे यांच्या जीवनावरील ‘ध्‍यासपर्व’मधून देण्यात आला आहे. त्यामुळे आजच्‍या प्रचंड बेरोजगारीच्‍या काळात तर प्रत्‍येक तरुणासाठी हा ग्रंथ म्‍हणजे सतत पठण करण्‍याची ‘गीताई’च आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी काढले. पाटील यांच्या हस्ते आज (शनिवार) मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी एन.डी.पाटील म्‍हणाले, १९७० च्‍या दशकात कृषि खात्‍यातील आपटे यांनी एम. एससी. पदवी सुवर्ण पदकाच्‍या मानासह प्राप्‍त केली. आयएएस दर्जाच्‍या नोकरीची संधी उपलब्‍ध असताना त्यांनी आपल्‍या वडिलोपर्जित शेती व दुग्‍ध व्‍यवसायात काम करण्‍याचा घेतलेला निर्णय हा ग्रामीण भागातील तरुणांना मार्गदर्शक ठरला आहे. त्यांनी दुग्ध व्यवसायाशी संबंधित माहिती घेऊन संकरीत गाईंचा दुग्‍ध व्‍यवसाय यशस्‍वी केला. जनता दुध संस्था, उत्तूर कार्यान्वित केली. मागील ३३ वर्षे गोकुळ दूध संघात संचालक म्‍हणून ते काम करीत आहेत. स्‍वभाव मितभाषी, मोजके बोलणे यामुळे त्‍यांचे व्यक्तिमत्त्व अजातशत्रू असे राहिलेले आहे.

या पुस्तकाचे लेखन सुभाष धुमे यांनी केले असून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजा शिरगुप्पे यांनी या पुस्तकाची प्रस्तावना केली आहे. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर, सौ. पद्मजा आपटे, सुधीर आपटे, सुभाष धुमे, आदित्‍य आपटे, प्रा. सुनिल शिंत्रे, अनंत पाटील, संतोष पोवार, अनिल रेडेकर, गोकुळचे जनसंपर्क अधिकारी संजय दिंडे आदी उपस्थित होते.

639 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा