Breaking News

 

 

आजच्या नाशिकच्या सभेत मोदी सरकारची मोठी पोलखोल : मनसेचा दावा

मुंबई (प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसांपासून आपल्या सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर प्रचंड टीका करीत आहेत. त्यांची ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे सांगत मोदी आणि अमित शहांचे जुने व्हिडिओ दाखवून केलेली टीका सर्वांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे त्यांच्या सभेस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भाजपलाही त्यांची दाखल घ्यावी लागली आहे. आज नाशिक येथे राज ठाकरे यांची सभा होणार असून ते आजच्या सभेत मोदी सरकारची सर्वांत मोठी पोलखोल करणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे

‘आज नाशिकच्या सभेत पोलखोलचा ग्रँड फिनाले’, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकं कोणत्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांची गुरुवारी पनवेलमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी लाव रे तो व्हिडिओ स्टाईलचा वापर करत मोदींच्या प्रचारसभेत एका व्हायरल व्हिडिओची पोलखोल केली. या वेळी मोदींची प्रचारसभा म्हणून व्हायरल होत असतानाचा व्हिडिओ चक्क दिवंगत भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेच्या वेळेचा असल्याचं भीषण वास्तव समोर आलं. आम्ही सत्य दाखून या मोदी सरकारची पोलखोल करत आहोत, असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आज होणाऱ्या शेवटच्या जाहीर सभेत राज ठाकरे मोठी पोलखोल करतील, असे संकेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून दिले आहेत.

903 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश