Breaking News

 

 

कार्यक्षमता असलेली व्यक्तीच यशस्वी उद्योजक बनू शकते : डॉ. अभिनव देशमुख

टोप (प्रतिनिधी) : अंगी कार्यक्षमता असलेली व्यक्तीच यशस्वी उद्योजक बनू शकते. अनेक ठिकाणी सवलती व अनुदान देवून उद्योजक बनविण्यासाठी प्रयत्न झाले. पण त्यांच्या मध्ये क्रियाशीलता,  पुरेसे ज्ञान, व्यवसायाची आवड नसल्यामुळे असे लोक यशस्वी उद्योजक बनू शकले नाहीत. असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले. ते शिरोली मँन्युफँक्चरर्स असोसिएशनच्या (स्मॅक) आयोजित चर्चासत्र व सभासद प्रमाणपत्र वितरण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील होते.

डॉ. देशमुख म्हणाले, कोल्हापूरचे उद्योजक हे अभ्यासू आणि कष्ट करण्याची क्षमता असलेले आहेत. औद्योगिक क्षेत्रात अनेक संकटे व अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण यावर त्यांनी यशस्वी मात करून आपले उद्योग चांगले सांभाळले आहेत. इतकेच नव्हे तर कोल्हापूर जिल्हा औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्रात एक नंबरवर असल्याचे सांगितले.

तसेच योग्य त्या उपयायोजना करुन ट्रॅफिकची समस्या सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. चोरी, वाटमारी सारखे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस दलासह इतरांनीही गुन्ह्याच्या तपासात मदत केली पाहिजे, असे आवाहनही केले.

यावेळी स्मँकचे उपाध्यक्ष अतूल पाटील, जयदीप चौगले, सचिन पाटील, दिपक पाटील, प्रशांत शेळके, बाळासाहेब कडोलकर, सचिन मेनन, अमर जाधव, संदिप पाटील, दिपक परांडेकर, राजन निकम,  दादा लडगे, स. पो. नि. परशुराम कांबळे, उद्योजक उपस्थित होते.

870 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *