Breaking News

 

 

…अखेर राधाकृष्ण विखेंंचा राजीनामा : काँग्रेसला धक्का !

नगर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होत आहे. तत्पूर्वीच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (गुरुवार) विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला  असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 

यापूर्वी आज सकाळी नगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनीही पदाचा राजीनामा दिला.  राहुल गांधींची शुक्रवारी शिर्डी मतदारसंघासाठी संगमनेरमध्ये सभा आहे, त्यापूर्वीच काँग्रेसला दोन धक्के बसले आहेत. गुरुवारी शिर्डी येथे पत्रकार परिषद घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विखे समर्थक असलेले करण ससाणे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारत जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती दिली. स्टार प्रचारकांमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाचा समावेश असतानाही त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला नाही. या प्रकरणी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावरील कारवाईचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले होते.

1,376 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash