Breaking News

 

 

प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांकडून ४० हजारांचा दंड वसूल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्लास्टिकबंदी असूनही त्याचा सर्रास वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून महापालिकेने आज (गुरुवार) सुमारे चाळीस हजार रुपयांचा दंड वसूल केला. मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

महापालिका क्षेत्रात प्लास्टिकबंदी असून काही व्यावसायिकांकडून त्यांचे उल्लंघन करीत वापर सुरुच आहे. या विरोधात महापालिकेने मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत डॉ. विजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज कावळा नाका परिसरातील केक बुक, बास्किन आणि रोम्बिस, चाट बाजार, राजवाडी, आक्कीज, वोक, ब्रेकफास्ट या व्यावसायिकांकडून प्रत्येकी ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. लोकसभा निवडणुकीनंतर ही मोहीम पुन्हा उघडण्यात आली असून पुढील काळात आणखी गतिमान करण्यात येणार आहे.

या कारवाईत विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक मुनीर फरास, करण लाटवडे नंदकुमार पाटील, स्वप्निल उलपे, सौरभ पाटील यांनी भाग घेतला.

597 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग