Breaking News

 

 

मारुतीने डिझेल कार्सबाबत घेतला अनपेक्षित निर्णय !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील मध्यमवर्गीयांत अत्यंत लोकप्रिय असलेल्या मारुती सुझुकीने डिझेल कारबाबत अनपेक्षित निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील वर्षापासून या कार्सचे उत्पादन थांबविण्यात येणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी आज (गुरुवार) ही घोषणा केली.

विशेष म्हणजे मारुती सुझुकीला दरवर्षी २३ टक्के नफा हा डिझेल गाड्यांतून येतो. आता मारुती सुझुकीकडून सीएनजीच्या गाड्यांचा पर्याय देण्यात आला आहे. भार्गव यांनी सांगितले की, १ एप्रिल २०२० नंतर डिझेल कारची विक्री बंद करणार आहोत. कंपनीने मार्च ३१ पर्यंत वर्षभरात १७.५३ लाख डिझेल गाड्या विकल्या आहेत.

2,727 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *