Breaking News

 

 

…आणि बऱ्याच दिवसांनी गजबजली जिल्हा परिषद !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली, आचारसंहिता लागू झाली त्याबरोबर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त झाले. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना निवडीचे काम लागले. त्यामुळे तब्बल दीड महिने जिल्हा परिषदेच्या दैनंदित कामात शिथिलता आली होती. आज अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामातून रिकामे झाल्याने जिल्हा परिषदेत कामाची वर्दळ वाढलेले चित्र दिसत होते.

लोकसभा निवडणूक कामासाठी जिल्हा परिषदेतील पाचशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. दीड महिने कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्याने अनेकांची कामे खोळंबली. मात्र आज गुरुवार अधिकारी व कर्मचारी कामावर हजर झाले. त्यांच्या कामाची लगबग सुरू झाली. जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कामासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

468 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे