Breaking News

 

 

तलाठी जयंत चंदनशिवे यांच्या कुटुंबीयांकडे १५ लाखांचा धनादेश सुपूर्द…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  निवडणूक कर्तव्यावर असताना अपघातात निधन पावलेले तलाठी जयंत चंद्रहार चंदनशिवे यांच्या वारसांना १५ लाखांचा सानुग्रह अनुदानाचा धनादेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी आज (गुरुवार) जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिला.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी आज कै. जयंत चंद्रहार चंदनशिवे यांच्या पाचगांव येथील घरी जाऊन त्यांच्या पत्नी श्रीमती चंदनशिवे यांना १५ लाखांचा सानुग्रह अनुदानाचा धनादेश दिला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे,प्रांताधिकारी सचिन इथापे,गगनबावड्याचे तहसिलदार लुगडे तसेच महसुल अधिकारी, तलाठी उपस्थित होते.

गगनबावडा तहसिल कार्यालयातील तलाठी जयंत चंद्रहार चंदनशिवे यांचे दिनांक २२ एप्रिल रोजी अपघाती निधन झाले होते. निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना निधन झालेले जयंत चंद्रहार चंदनशिवे यांच्या कुटुंबियांना शासन निर्णयानुसार १५ लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी तात्काळ शासनाला सादर केला होता. या प्रस्तावास शासनस्तरावर मान्यता मिळाल्याने हा धनादेश चंदनशिवे कुटुंबीयांना देण्यात आला.

1,437 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash