खुनी हल्ल्याबद्दल तिघांना कारावास

0 1

मलकापूर (प्रतिनिधी) : माण (ता.शाहूवाडी) येथील विलास पांडूरंग पाटील व त्यांच्या भावास मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून नाना पाटील, रमेश पाटील, माया पाटील  (रा.माण) या तिघांना एक वर्षाचा कारावास व दंड सुनवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माण येथील  विलास पांडूरंग पाटील व त्यांचे भाऊ यांना १ मे 2011 रोजी शेतात बोलवून नाना पाटील, रमेश पाटील व माया पाटील यांनी मारहाण केली. याबाबत विलास पाटील यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सदरचा खटला शाहूवाडी – मलकापूर न्यायालयात सुरू होता. सदरची सुनावणी न्यायदंडाधिकारी ए.ए.वाळूजंकर यांनी ठोठावली आहे. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन  पो. कॉ. व्ही.टी. शिंदे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More