Breaking News

 

 

वाढलाय उन्हाळा, आरोग्य ‘असे’ सांभाळा !

सतत तहान लागते ? खूप घाम येतो ? आईस्क्रिम खावंसं वाटतंय ? ही सगळी लक्षणं अगदी स्वाभाविक आहेत. आता बऱ्यापैकी तापमान वाढू लागलं आहे. थोड्यात दिवसात याची तीव्रताही अधिक जाणवू लागेल आणि घामाच्या धारांचा सामना करावा लागणार आहे. या घाम आल्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. अशा वेळी तब्येतीची काळजी कशी घ्यावी याविषयी घ्या जाणून –

उन्हाळ्यात व्यायाम करताय ?

व्यायाम करण्याच्या एक तास आधी एक-दोन ग्लास पाणी पिऊन घ्या. व्यायाम करताना मधल्या ब्रेकमध्ये थोडथोड पाणी पित रहा. व्यायाम करून झाल्यावर लगेच पाणी पिऊ नका. थोड्या वेळ जाऊ द्या आणि मग सावकाश पाणी प्या.

उन्हाळ्यात करायचे व्यायामप्रकार –
१. उन्हाळ्यात पोहणं हा एक उत्तम व्यायामप्रकार आहे. पोहण्यामुळे स्नायूंवर कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही. हा अतिशय आरामदायी प्रकार आहे.
२. जिममधली बाइक, स्पिन क्लास अथवा प्रत्यक्ष सायकल चालवणं यापैकी काहीही तुम्ही सोयीनुसार निवडू शकता. या प्रकारामुळे जास्त दमायला होत नाही आणि सर्वांगाचा व्यायामही होतो. 
३. ट्रेडमिलवर इंडोअर वर्कआऊट करू शकता. पण बाहेर जाऊन प्रत्यक्ष चालणं अधिक फायद्याचं ठरेल. जवळच्या एखाद्या मोकळ्या फुटपाथवर, बागेत, पार्कात, समुद्रकिनारी किंवा टेकडीवर तुम्ही चालायला जाऊ शकता. 
व्यायाम करण्यासाठी सकाळी लवकर उठा किंवा मग संध्याकाळच्या वेळेला पसंती द्या.

खास टीप्स –
वेगवेगळ्या फळांचे रस पिण्यास प्राधान्य द्या. नारळाचं पाणी हा एक उत्तम ऊर्जास्रोत आहे, कुठेही प्रवासाला जाताना बरोबर पाण्याची बाटली ठेवा. म्हणजे थोड्याथोड्या वेळाने घोट-घोट पाणी पिता येईल, उन्हाळ्यात भरपूर व्यायाम करत असाल तर स्पोर्ट्स ड्रिंक्सना पर्याय नाही, शरीराला योग्य आराम मिळतोय ना, याची खात्री करा. अतिव्यायामाचा त्रास होण्याची दाट शक्यता असते. अति दगदग करणं उन्हाळ्यात कटाक्षानं टाळा. या गर्मीच्या मोसमात तुमची तब्येत सांभाळणं जास्त महत्त्वाचं आहे.­

792 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा