राज्यातील ८९ उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची : एडीआर

0 1

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. यामध्ये राज्यातील १७ मतदारसंघांत ३२० उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील १०९ उमेदवार कोटय़ाधीश आहेत.  तर निवडणूक लढवणाऱ्या ८९ उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याची माहिती ‘एडीआर’ने दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने उमेदवारांच्या आर्थिक, शैक्षणिक व प्रतिज्ञापत्राच्या आधारांवर विश्लेषण केले आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक रिंगणातील ३४ टक्के उमेदवार आर्थिकदृष्टय़ा अतिशय सधन आहेत.

तर वंचित बहुजन आघाडीचे व बहुजन समाज पक्षाचे सहा उमेदवार कोटय़धीश आहेत. तर ६४ उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाच्या गुह्यांची नोंद आहे. दोन उमेदवारांच्या विरोधात गुन्हे सिद्ध झाले असून वंचित बहुजन आघाडीचे नाशिकचे उमेदवार पवन कुमार यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More