Breaking News

 

 

प्रकाश आंबेडकरांना निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई (प्रतिनिधी) : रावेर मतदारसंघात आपले मत दुसऱ्याच उमेदवाराला पडल्याचा कांगावा करणाऱ्या अमोल सुरवाडे या मतदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर निवडणूक आयोगाने ‘ईव्हीएम’ घोटाळ्याच्या आरोपावरून बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना नोटीस बजावली आहे.

मतदान यंत्राच्या माध्यमातून मतदान घेण्यास आक्षेप घेत विरोधकांनी देशभर रान उठविले आहे. मात्र मतदान यंत्रात कोणताही फेरफार करता येत नसल्याच्या मुद्दय़ावर निवडणूक आयोगाने अफवा पसरविणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. आंबेडकरांचा खुलासा आल्यानंतर याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

645 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा