कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे दोन भाग झाल्यापासून संपूर्ण राज्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोल्हापूर जिल्हातील नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केलीच आहे. पण माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मात्र आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केली नाहीय. पण वेळोवेळी नरके यांनी शिंदे यांच्या जवळपास दिसून आपली भूमिका अप्रत्यक्षरित्या व्यक्त केली आहे. काल झालेल्या दसरा मेळाव्यातही स्टेजच्या समोर नरके त्यांची उपस्थिती दिसून आलीय.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन गटात पराकोटीचा संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्वच सेनेच्या नेत्यांनी आपली भूमिका कधीच स्पष्ट केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर या प्रत्येकांनी आपापली भूमिका कधीच स्पष्ट केलीय. पण या सर्व धामधुमीत माजी आमदार चंद्रदीप नरके हे मात्र आपली ठोस भूमिका मांडण्यात अजूनही मागेच राहीले आहेत.

आजही नरके हे कोणाच्या बाजूला हे त्यांनी उघडपणे स्पष्ट केले नाहीय. पण यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौर्यावर आल्यावर त्यांची उपस्थिती तिथे ठळकपणे जाणवली होती. त्यावेळी त्यांनी आपण एक माजी आमदार म्हणून मतदार संघातील कामे घेऊन भेट घेतल्याचे सांगितले होते. दरम्यान काल संपूर्ण राज्यात चर्चेला आलेला दसरा मेळाव्यात दोन्ही गटांनी आपली ताकत दाखविण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. काल झालेले दोन्ही मेळावे सर्वच मराठी वृत्तवाहिन्यावर लाईव्ह दाखविण्यात आले होते. राज्यातील सर्व जनतेने हे मेळावे पाहिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या दसरा मेळाव्यात कोल्हापूरचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे दिसून आले. कोल्हापुरात नरके यांनी आपली भूमिका भलेही उघडपणे व्यक्त केली नसेल पण शिंदे यांच्या मेळाव्याला नरके यांनी आपली उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. नरके हे जरी शिंदे यांच्या मेळाव्याला उपस्थित राहिले असले तरीही अजूनही त्यांनी आपली  भूमिका उघडपणाने स्पष्ट झालेली नाहीय. त्यामुळे नरके हे नेमके कोणत्या गटाचे हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.

ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी…