Breaking News

 

 

…अखेर ‘वाराणसी’मधून मोदींविरुद्ध काँग्रेसचा उमेदवार ठरला !

वाराणसी (वृत्तसंस्था) : वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या मतदारसंघात लक्षवेधी लढत होईल, असा अंदाज देशभरातून व्यक्त होत होता, मात्र त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने मागील निवडणुकीत मोदी यांचेविरुद्ध लढत दिलेल्या अजय राय यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे.

मागील निवडणुकीत मोदी यांचेविरुद्ध काँग्रेसकडून अजय राय तर ‘आप’कडून अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढवली होती. मोदी यांनी केजरीवाल यांचा सुमारे ३ लाखांवर मतांनी पराभव केला होता. मोदी यांना शह देण्यासाठी प्रियांका गांधी यांना यंदा उमेदवारी द्यावी, अशी मागणी काही काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली होती. खुद्द प्रियांका गांधी यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत दिले होते. मात्र अखेर काँग्रेसने पुन्हा राय यांनाच उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने पराभवाच्या भीतीनेच प्रियांका गांधी यांना वाराणशीमधून उमेदवारी दिली नसल्याची टीका भाजपने केली आहे.

1,182 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे