कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा एज्युकेशन सोसायटी संचलित कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेत समाजशास्त्र विषयाच्या ‘आई’ या भित्तीपत्रकाचे अनावरण महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा  मुख्याध्यापक संघाचे सहसचिव अजित रणदिवे, संचालक श्रीकांत पाटील, कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे  प्राचार्य एस. जी. गुरव, पन्हाळा-गगनबावडा माध्यमिक व उच्च माध्यमिक  मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. आर. पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव व आर. पी. चौगुले, माजी अध्यक्ष के. बी. टक्के- पाटील, सचिव एच. वाय. शिंदे, पन्हाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किरण सुतार, कळे विद्या मंदिरचे पर्यवेक्षक ए. बी. गायकवाड,  एन.एम.एम.एस.  बुद्धिमत्ता तज्ञ मार्गदर्शक प्रकाश पाटील,  भित्तीपत्रकाचे संपादक प्रा. एस. एस. खांबे आदी मान्यवर उपस्थित होते.