Breaking News

 

 

…म्हणूनच ‘पीएम मोदी’ प्रदर्शनास परवानगी दिली नाही : निवडणूक आयोग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चरित्रपटाचे प्रदर्शन का रोखण्यात आले याची करणे निवडणूक आयोगाने स्पष्ट केली आहेत. हा चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादिवशी म्हणजे ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. याविरुद्ध अनेकांनी आक्षेप घेऊन थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ‘पीएम मोदी’ या चित्रपटात मोदी यांचे अनावश्यक उदात्तीकरण केले असून त्यामुळे मतदारांवर याचा प्रभाव पडू शकतो, हे लक्षात घेऊनच त्याच्या प्रदर्शनास आम्ही परवानगी दिलेली नाही, असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.   

या चित्रपटाचे प्रदर्शन मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे १९ मे पर्यंत करू नये, असाही आदेश आयोगाने दिला आहे. त्यावरून निर्मात्यांनी सर्वाच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने या संबंधात आयोगाला बाजू मांडण्यास सांगितल्यानंतर आयोगाने २० पानी अहवालच दिला असून त्यात एका विशिष्ट पक्षाला आणि नेत्याला अनुकूल वातावरण तयार होऊन आचारसंहितेचा भंग होईल, असे आयोगाने म्हटले आहे.

या चित्रपटातील अनेक दृश्ये ही विरोधी पक्षाला अत्यंत भ्रष्ट दाखवणारी आणि त्यांच्या विरोधी प्रचार करणारी आहेत. त्या नेत्यांची नावे घेतली जात नसली तरी चेहऱ्यातील साधर्म्यामुळे त्यांना प्रेक्षक सहज ओळखू शकतात. हा चरित्रपट चरित्राचे अनावश्यक उदात्तीकरण करणारा आहे. काही प्रतीके, घोषणा आणि दृश्यातून एकाच व्यक्तीला प्रमाणाबाहेर मोठेपणा दिला जात आहे, त्याचा मतदारांवर प्रभाव पडू शकतो, हे लक्षात घेऊनच या चित्रपटाच्या निवडणूक काळात केल्या जाणाऱ्या प्रदर्शनाला आम्ही परवानगी दिली नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे