Breaking News

 

 

उन्हामुळे जलतरण तलावांवर रांगा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसात कोल्हापूरचा पारा ४० च्या पुढे गेला आहे. त्यामुळे अंगाची लाही – लाही होत आहे. या उष्म्यापासून सुटका करण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाययोजना करत आहे. लहान मुलांनी तर चक्क जलतरण तलाव गाठायला सुरुवात केली आहे. परिणामी जलतरण तलावांंवर रांगा लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

उन्हाच्या तडाख्यामुळे सर्व जण त्रासले असून अजून मे महिना शिल्लक असल्याने हे दिवस काढायचे कसे असा प्रश्न पडला आहे. कोल्हापूरचा पारा ४२ पर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही वर्षातील तापमानाचा हा विक्रमच म्हणावा लागेल. प्रचंड उन्हामुळे गारवा मिळवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या सोयीप्रमाणे प्रयत्न करत आहे. लिंबू सरबत, ताक, कलिंगड, आइस्क्रीम यासह सर्वच शीतपेयांना मागणी वाढू लागली आहे. उन्हापासून सुटका मिळविण्यासाठी लहान मुले जलतरण तलावाकडे धाव घेऊ लागले आहेत. कडक उन्हाळा आणि सुट्टयांमुळे जलतरण तलावावरील गर्दी वाढू लागली आहे. किमान एक तास पोहण्यास मिळावे यासाठी दोन-दोन तास रांगेत प्रतीक्षा करावी लागत आहे.

कोल्हापूर शहरात महापालिकेचे तीन जलतरण तलाव असून त्यापैकी एक बंद अवस्थेत आहे. अंबाई टॅंक, रमणमळा टॅंक हे दोन तलाव सुरू आहेत. मात्र, टाकाळा येथील खाजगी व्यवस्थापनाकडे दिलेला शाहू तलाव बंद आहे. याशिवाय शहरात शिवाजी स्टेडियम, भवानी तसेच शाहू महाविद्यालयात असे तीन जलतरण तलाव आहेत.

महापालिकेच्या जलतरण तलावांंवर गर्दी होऊ लागली असून पोहण्यासाठी रांगा लागल्याचे दिसत आहे. या तलावांंवर प्रत्येक ठिकाणी दोन जीवरक्षक व एक रोखपाल आहेत. गर्दी होऊ लागल्याने येथील कर्मचाऱ्यांवर ताण पडू लागला आहे. उन्हाच्या त्रासामुळे जलतरण तलावावर तसेच पंचगंगा नदी, रंकाळा तलाव, रंकाळा खण तसेच अन्य तलावावर गर्दी होऊ लागली आहे.

351 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे