Breaking News

 

 

जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये भारतीय सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. आज (गुरुवारी) सकाळी अनंतनागच्या बगेंदरमध्ये ही चकमक घडली.

सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. मारले गेलेले दहशतवादी हे हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र साठा आणि दारु गोळा सापडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

बगेंदरमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा रक्षकांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. या दरम्यान सुरक्षा रक्षकांवर गोळीबारास सुरूवात झाली. सुरक्षारक्षकांनी याला जशास तसे उत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. अजूनही या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.

330 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे