Breaking News

 

 

येलुर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत पै. माऊली जमदाडेचे यश…

मलकापूर (प्रतिनिधी) :  येलुर (ता.शाहुवाडी) येथील जोतिर्लिंग यात्रे निमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात गंगावेश तालमीचा पै. माऊली जमदाडे यांने आंतरराष्ट्रीय चॅम्पीयन हरीयाणाच्या पै. अशोक कुमार याच्यावर गदालोट डावावर विजय मिळवून प्रथम क्रमांकाचा किताब पटकाविला.

यावेळी लहान गटातील अनेक छोट्या पैलवानानी चटकदार कुस्त्या करून कुस्ती शौकिनांची मन जिंकली. प्रथम क्रमांकाच्या लढतीसाठी पै. माऊली जमदाडे आणि पै. अशोक कुमार यांच्यात झाली. सुरवातीपासूनच आक्रमक असलेल्या माऊलीने अशोक कुमारचा ताबा घेतला होता. प्रतिडाव करून किल्ली तोडण्याचा प्रयत्न धुडकावून सातव्या मिनिटाला माऊली जमदाडेने गदालोट डावावर कुस्ती निकाली केली. यावेळी पंच म्हणुन बांधकाम व आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील यांनी काम पाहिले.

दोन नंबरची लढत हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांचा पट्टा पै. विकास पाटील आणि हांडे तालीम सांगलीचा पै. सादिक पठाण यांच्यात झाली. सुरुवातीला दोघांनीही ताकदीचा अंदाज घेऊन डाव प्रतिडाव केले. आठव्या मिनिटाला विकासने सादिकवर ताबा घेऊन घुटना डावावर विजय मिळविला.

तीन नंबरच्या कुस्तीसाठी पै. अभिजित भोसले, शित्तूर आणि पै. प्रदीप ठाकूर, सांगली यांच्यात झाली. ही लढत तु्ल्यबळ झाल्याने अर्ध्या तासानंतर बरोबरीत सोडवण्यात आली. पंच म्हणून पांडूरंग पाटील यांनी काम पाहिले. यावेळी कुस्तीच निवेदक म्हणून दिपक वरपे, म्हाळंगे व बाळासो गुरव यांनी केले.

360 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे