Breaking News

 

 

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर वॉरंट जारी

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात यवतमाळच्या पुसद न्यायालयानं वॉरंट जारी करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा संदर्भात दैनिक सामन्यात प्रकाशित केलेल्या एका व्यंगचित्राप्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आले आहे. व्‍यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि प्रसिद्ध राजेंद्र भागवत यांच्‍याविरुद्धही वॉरंट जारी करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणी घेऊन झालेल्या आंदोलनादरम्यान शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून हे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आलं होतं. कोर्टासमोर हजर न झाल्यानं कोर्टानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध वॉरंट बजावलंय.

सुनावणीदरम्यान, उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत आणि इतर आरोपी कोर्टासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे कोर्टानं त्यांच्याविरुद्ध समन्सही धाडले. त्यानंतर आता न्यायालयानं आरोपींविरुद्ध १५ हजार रुपयांचं बेलेबल वॉरंट जारी केले आहे.

1,134 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

 

क्रीडा