Breaking News

 

 

बाजार भोगावामध्ये आठवडी बाजारात वाहनांची प्रचंड कोंडी…

बाजार भोगाव (प्रतिनिधी) : बाजार भोगाव (ता.पन्हाळा) येथे आठवडी बाजार दर बुधवारी भरला जातो. बाजार भोगावची ही बाजारपेठ मोठी असून तेथे लाखो रुपयांची उलाढाल होत असते. पण या बाजाराच्या दिवशी वाहतुक व्यवस्थेची प्रचंड कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.

या बाजारात भाजीपाला विकण्यासाठी स्त्री व पुरुष रस्त्याला लागूनच भाजी विकण्यासाठी  बसतात. यामुळे येथे दुचाकी गाड्या, वडाप गाड्या या रस्त्याच्या बाजूला लावल्या जातात. त्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे गाड्या लावण्यासाठी पार्किंगची  सोय दुसरीकडे करणे गरजेचे आहे. यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था  ग्रामपंचायतीने करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.

861 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे