कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा दसरा मेळावा उद्या (बुधवार) मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे १० हजार शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

या मेळाव्यासाठी खासगी बसेस आणि चारचाकी वाहनातून उद्या सकाळी ७.०० वाजता किणी टोल नाका, कोल्हापूर येथून ही वाहने मुंबईकडे रवाना होणार आहे. तर जिल्ह्यातील अनेक गावांसह शहरातील अनेक प्रभागातून या बसेस सकाळी ७.०० वाजता किणी टोल नाका येथे दाखल होणार आहेत. याठिकाणी राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ही वाहने एकत्रित मुंबईकडे रवाना होतील, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.