कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त देशभर ‘हिंदू राष्ट्र संकल्प अभियान’ ५ ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समितीने ‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ केला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेत राष्ट्रप्रेमी नागरिकांनी घरांवर तिरंगा फडकवून देशप्रेम व्यक्त केले. याचप्रकारे आता ‘हर घर भगवा’ मोहिमेत सहभागी होऊन हिंदू राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करून विजयादशमी साजरी करावी, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने केले आहे.

‘हर घर भगवा’ या मोहिमेत सहभागी होण्यासाठी भगव्या ध्वज आपल्या घरावर लावून त्यासोबत ‘सेल्फी’ काढावा आणि तो ‘फेसबुक’, ‘ट्वीटर’, ‘इन्स्टाग्राम’ आदी सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित करावा. फोटो पोस्ट करताना ‘#HarGharBhagwa’ हा हॅशटॅग वापरावा, असे आवाहन समितीने केले आहे. या अभियानासाठी समितीने ‘HinduRashtra.HinduJagruti.org’ हे स्वतंत्र ‘पेज’ चालू केले आहे. हर घर भगवा’ या अभियानात सहभागी होणाऱ्या समितीच्या वतीने ‘हिंदू राष्ट्र वीर’ प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी वरील ‘पेज’वर जाऊन ‘फॉर्म’ भरावा, असे समितीने म्हटले आहे.

समितीचे जिल्हा समन्वयक  किरण दुसे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावांमध्ये आणि गल्ल्यांमध्ये भगवा ध्वज डौलाने फडकला आहे. उचगाव येथील लोणार वसाहत येथील १०० घरांवर भगवा ध्वज लावण्यात आला आहे.