Breaking News

 

 

राज्यात कोल्हापूर मतदानात ठरलंय लई भारी ! : दिग्गजांचे भवितव्य यंत्रात बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (मंगळवार) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १४ जागांसह देशात ११७ जागांसाठी आज (मंगळवार)  मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. राज्यामध्ये ५६.५७ टक्के मतदान झाले असून पुणे मतदारसंघात नीचांकी ४४.४५ तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ६९.४१ टक्के मतदान झाले आहे.

वैयक्तिक राग, द्वेष, टोकाची स्पर्धा, गटातटाचं राजकारण, सत्ता संपादनासाठीची धडपड, एकमेकांची जिरवण्याची इर्षा, पक्षातंर्गत मतभेद यामुळे जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात आज इर्षेने मतदान झाले. मतदानाच्या बाबतीत कोल्हापूरने बाजी मारली असून टक्केवारीत कोल्हापूर राज्यात भारी ठरले आहे. कोल्हापूर मतदारसंघात ६९.६५ तर हातकणंगलेमध्ये ६९.१७ टक्के मतदान झाले. जिल्ह्याचे सरासरी मतदान ६९.४१ इतके झाले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांची महाआघाडी आणि दुसरीकडे भाजप-सेनेची महायुती यांच्यातील संघर्ष या निवडणूकीत अनुभवायला मिळाला. दिग्गजांच्य प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच जबरदस्त इर्षा पहायला मिळाली. त्याचा परिणाम म्हणून आज कोल्हापूर मतदानाच्या टक्केवारीत भारी ठरले. आता खा. धनंजय महाडिक, प्रा. संजय मंडलिक, खा. राजू शेट्टी, धैर्यशील माने यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. पक्षांच्या कार्यकर्त्यांसह मतदारांनाही आता प्रतिक्षा आहे ती २३ मेची. म्हणजेच निकालाच्या दिवसाची.

462 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *