Breaking News

 

 

धामणी खोऱ्यातील ५२ गावांचा मतदानावर बहिष्कार

कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यातील  ५२ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा या तीन तालुक्यांना जोडणारा राई (ता.राधानगरी) येथील  धामणी मध्यम प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी मतदारांनी बहिष्कार टाकला. सुमारे ३०, ००० मतदारांनी मतदान केले नसल्याने मतदान केंद्रे अक्षरश: ओस पडली होती.

गावातील सर्व मतदारांनी बहिष्कार टाकल्याने मतदान केंद्रे  ओस पडली होती. त्यामध्ये गगनबावडा तालुक्यातील  बावेली, बावेली पैकी ३ वाड्या, कडवे, मुसलमानवाडी, गारीवडे, मालदारवाडी, जर्गी, देऊळवाडी, शेळोशी, खेरीवडे, धुंदवडे, रासमवाडी, हरीजनवाडा अशी आहेत.  राधानगरी तालुक्यातील चौधरवाडी, गवशी, पाटीलवाडी, पात्रेवाडी, पखालेवाडी, कुपलेवाडी, कोनोली, पानारवाडी, म्हासुर्ली, जोगमवाडी, सावतवाडी, भित्तमवाडी, बेघरवाडी, कुंभारवाडी, अस्वलवाडी, झापाचीवाडी, पादुकाचावाडा, बाजारवाडा  अशी आहेत.

पन्हाळा तालुक्यातील बळपवाडी, पणोरे, वेतवडे,  वेतवडेपैकी मुसलमानवाडी, खामणेवाडी, धनगरवाडा, निवाचीवाडी, हरपवडे, आंबर्डे आणि सुळेतील बोगरे गटाने    मतदानावर बहिष्कार टाकला.

या बहिष्कारामुळे शून्य टक्के मतदान अशी नोंद झाली आहे. यामुळे सुमारे ३० हजार मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. आधी जाहीर केलेल्या पन्हाळा तालुक्यातील कोदवडे, आकुर्डे, सुळे, वाघुर्डे, पणुत्रे व राधानगरी तालुक्यातील चौके मानबेट या गावातील ग्रामस्थांनी  मतदानावर बहिष्कार मागे घेत मतदान केले. मात्र, कृती समितीने बहिष्कार यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.

1,674 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash