Breaking News

 

 

चंदगड मतदारसंघात दुपारपर्यंत ४० टक्के मतदान…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये दुपारी दोनपर्यंत ४० टक्के मतदान झाले आहे. आज (मंगळवार) सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर गर्दी होती. सकाळी ११ पर्यंत २३.१२ मतदान झाले होते. महिला आणि युवकांची संख्या उल्लेखनीय होती. मतदान शांततेत पार पडले आहे. चंदगड मतदारसंघात ३, १९, 1१४३ इतके मतदार असून पैकी ६३७८६ महिला आणि ६५३५० पुरुषांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.

आज सकाळी गडहिंग्लज येथील प्रमुख मतदान केंद्रांना शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, आ. हसन मुश्रीफ, युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी भेट दिली. या वेळी संजय मंडलिक यांनी कडक ऊन असूनही मतदार मतदानासाठी बाहेर पड़त आहेत, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

सर्वत्र मतदान शांततेत पार पडले असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील काही गावात दुपारी मतदान यंत्रे बंद पडली होती, तत्काळ निवडणूक विभागाने मशीन चेंज केल्या तर काही ठिकाणी मशीन बदलण्यात वेळ झाल्याने मतदार केंद्रावर थांबून होते.

2,828 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे