Breaking News

 

 

कागल तालुक्यात दुपारपर्यंत सरासरी ४४ टक्के मतदान…

मुरगुड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात लोकसभेसाठी बंपर मतदान होण्याची शक्यता आहे. भर दुपारी रणरणत्या उन्हातही मतदारांनी उत्साहात मतदान केले. दुपारी दोन वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी ४४ टक्के मतदान नोंदवले गेले.

यावेळी प्रथमच तालुक्यात अत्यंत शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुपारी दीड पर्यंत  तालुक्यातील ३ लाख ४१हजार २८४ मतदारांपैकी १ लाख ३९ हजार २५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला . तालुक्यातील ८७ गावात  सकाळपासूनच मोठ्या संख्येने मतदार रांगेत होते.

मुरगूड शहरात निवडणूक आयोगाने नगरपालिकेच्या साह्याने आदर्श मतदान केंद्र कन्या शाळेच्या परिसरात उभे केले आहे. हे केंद्र आकर्षणाचा भाग बनला आहे. शिवसेने महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी चिमगाव येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या सुमारास राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी कागल येथील मतदान केंद्रावर भेटी देऊन तालुक्याचा  दौरा केला.

894 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash