Breaking News

 

 

भुदरगड तालुक्यात दुपारपर्यंत ५३ टक्के मतदान…

कडगांव (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील  करडवाडी, पारदेवाडी, निष्णप, कुंभारवाडी, पाचर्डे ,नितवडे, दोनवडे, कडगांव आदी मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदान सुरळीतपणे चालू झाले आहे. दुपारी १.३० पर्यंत भुदरगड तालुक्यामध्ये ५३ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.

नोकरदार, शेतकरी मतदारांनी सकाळीच मतदान करून शेताची  वाट धरल्याचे दिसून येत आहे. तसेच नव्या मतदारांचा  नोंदणी झालेले युवक-युवतीमध्ये कमालीचा आनंद दिसून येत होता.

नवीन मतदारांचे व जेष्ठ नागरिकांचे केंद्राध्यक्ष व झोनल अधिकारी, तलाठी यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.  निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस आपली सेवा बजावत होते.

615 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग