Breaking News

 

 

निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच मोदी सरकारकडून कृती योजनेस प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच पुढील सरकार मोदी सरकारच येणार, असा विश्वास बाळगत विद्यमान मोदींनी कामाला सुरूवात केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने २३ मे नंतरच्या १०० दिवसांची कृती योजना आखायला सुरूवात केली आहे.

सत्तेवर आम्हीच येणार, असा विश्वास ठामपणे भाजपा वर्तुळात व्यक्त होतो आहे. मात्र हा निव्वळ राजकीय अभिनिवेश नसून निवडणुकीनंतरच्या कारभारासाठी तयारीला लागल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या या आदेशातून व्यक्त होतं.

प्रत्येक मंत्रालयाच्या सचिवाला पंतप्रधान कार्यालयाने कृती योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. २३ मे नंतर जे सरकार येईल त्याला हा कृती कार्यक्रम उपयोगी पडेल, अशी प्रतिक्रिया विभागाच्या सचिवाने दिली.

621 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *