कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त नागाळा पार्क येथील महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गरबा आणि दांडिया स्पर्धा, ३ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी महाकुंकूमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.

यामध्ये रविवारी होणाऱ्या दांडिया स्पर्धेत बेस्ट दांडिया-गरबा किंग-क्विन, बेस्ट व्हेटरन, बेस्ट कपल तसेच सर्व सहभागी लहान मुलांना विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत. शिवाय या स्पर्धेत सुमारे २०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

नागाळा पार्क आणि विशाळगडकर परिसर येथे १९८५ साली महाराष्ट्र सांस्कृतिक महामंडळाची स्थापना कोल्हापूर येथे करण्यात आली. या मंडळामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रमाद्वारे भारतीय सांस्कृतीचा वारसा जोपासण्याचे काम नेहमी करण्यात येत आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळ नेहमी विविध प्रबोधात्मक उपक्रम, पुरोगामी विचारांची जपणूक करून सामाजिक कार्य करीत आले आहेत.

यावेळी माजी महापौर अर्जुन माने, घाटगे ग्रुपचे तेज घाडगे, अभिषेक मोहिते, कटेना कॉफी, चिपडे सराफ, पॅरेडाईज डेव्हलपर्स, स्पेसक्राफ्ट, आक्रिटेक्ट, माधुरी डेअरी, सर्वग्यान अकॅडेमी आदींकडून विशेष सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाच्या प्रवेश पासासाठी स्पर्धकांनी कटेना कॉफी, महावीर कॉलेज समोर, नागाळा पार्क येथे संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.