Breaking News

 

 

चांदमवाडीतील तरुणाला मदतीची गरज…

कडगांव (प्रतिनिधी) : चांदमवाडी (ता.भुदरगड) येथे हुबरचा माळ येथील शेतात रात्री रखवालीला गेलेले मनोहर मारुती चांदम (वय ३२) या तरुणाला गव्याने पाठीमागून धडक दिली. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ही घटना २६ मार्च रोजी घडली होती. यावेळी ग्रामस्थांनी मनोहरला कोल्हापूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये व त्यानंतर पुढील उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल येथे दाखल केले होते.

मनोहर हा घरातील कर्ता पुरुष असून त्यांच्या घरची परिस्थिती ही बेताची असल्याने त्यांचे कुटुंब हवालदिल झाले आहे. मनोहरच्या उपचारासाठी जवळपास दोन लाख रुपये खर्च झाले आहेत. तर पुढील उपचारासाठी त्याला किमान चार लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तरी वनखात्याकडून या मदतीची अपेक्षा ग्रामस्थ आणि मनोहरच्या कुटुंबाकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे