Breaking News

 

 

बँकिंग हॅकर्सच्या शोधासाठी पोलीसांचा ऑनलाईनवर भर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील कोल्हापूर अर्बन को-ऑप बँकेच्या एचडीएफसी शाखेत असलेल्या दोन खात्यावरील ६७ लाख ८८ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन बँकिंगची माहिती हॅक करुन अज्ञातांनी ३४ खात्यावर परस्पर हस्तातंर केल्याने या दोन्ही बँकेना हँकर्सनी दिलेल्या जबर धक्क्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ माजली आहे. याबाबत शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इलेक्ट्रॉनिक तंत्राचा गैरवापर करणाऱ्या हॅकर्सचा शोध घेण्यासाठी पोलीसांना मात्र ऑनलाईन पद्धतीवरच अधिक भर द्यावा लागत आहे.

कोल्हापूर अर्बन बँकेची दोन खाती एचडीएफसी बँकेच्या शाहुपूरी शाखेत आहेत. अर्बन बँकेची दैनंदिन उलाढाल एचडीएफसी बँकेच्या या दोन खात्यावरुन होत असते. जास्तीतजास्त ऑनलाईन पद्धतीने या खात्यावर होणाऱ्या व्यवहाराचा हॅकर्सनी फायदा घेण्यासाठी १९ एप्रिल रोजी असणाऱ्या सार्वजनिक सुट्टीचा उपयोग केला. एचडीएफसी बँकेतील अर्बन बँकेच्या दोन खात्यावरील ६७ लाख ८८ हजार रुपये इतरत्र अवघ्या तीन तासात हस्तातंर केले. एक लाख ते साडे तीन लाख रुपयांच्या रक्कमा हस्तातंर केल्यानंतर ही बाब दुसऱ्या दिवशी अर्बन बँकेतील कनिष्ठ अधिकारी शिल्पा मोहिते आणि मिनाक्षी लुकतुके यांच्या निदर्शनास आली.

त्यांनी आपल्या वरिष्ठांना ही सांगितली. वरिष्ठांनी एचडीएफसी बँकेशी संपर्क साधून याबाबत विचारणा केल्यानंतर एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्यांनाही आपल्या बँकेवर सुट्टीच्या काळात हॅकर्सनी दरोडा घातल्याचे लक्षात आले. याबाबत अर्बन बँकेच्या वतीने शाहुपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल झाला.

पोलीस निरिक्षक संजय मोरे यांनी सायबर शाखेची मदत घेवून तपास सुरु असल्याचे सांगितले. यासाठी उपलब्ध कागदपत्रे, कोड क्रमांक याचा आधार घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन बँकिंगच्या प्रक्रियेचा वापर करुन ऑनलाईन पद्धतीनेच अधिक तपास करावा लागणार असल्याने प्रत्यक्ष हॅकर्स पर्यंत पोहचणे हे सायबर शाखेपुढील खरे आव्हान आहे.

288 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे