Breaking News

 

 

डी.वाय. कडून ऊस उत्पादकांना २,८०० रुपये अदा…

गगनबावडा (प्रतिनिधी) :  असळज (ता.गगनबावडा) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याने संपलेल्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्‍या शेतक-यांना आत्तापर्यंत २,८०० रुपये अदा केले आहेत. एफआरपी प्रमाणे ५०० रूपयांचा दुसरा हप्ता आदा करण्यात आला आहे. त्यापोटी १५ कोटी ६२ लाख ९७ हजार रुपये उत्‍पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्‍याचे चेअरमन आ. सतेज पाटील यांनी दिली.  उर्वरित १०० रूपयांचा जादा हप्‍ताही दिवाळीपूर्वी दिला जाणार असल्‍याचेही त्यांनी सांगितले.

ते म्‍हणाले, कारखान्‍याने या हंगामात ३ लाख १२ हजार ५५३ टन ऊसाचे गाळप करुन सरासरी १२.२५ टक्‍के साखर उता-याने ३,८२,७५० क्विंटल साखर पोत्‍यांचे उत्‍पादन केले. तोडणी वाहतुक खर्च वजा जाता निव्‍वळ एफ.आर.पी. २,७८७ रूपये होते. मात्र, संचालक मंडळाने ऊसास प्रतिटन २,९०० रूपये दर देण्‍याचे निश्चित केले होते.

जिल्‍हयातील अन्य कारखान्‍यांनी यापूर्वी एफ.आर.पी.पोटी २,३०० रूपयांचा पहिला हप्‍ता आदा केला आहे. केंद्र शासनाच्‍या सॉफ्ट लोन योजनेतंर्गत मंजूर झालेल्‍या कर्ज रक्‍कमेतून ऊस दरापोटी ५०० रूपयांचा दुस-या हप्‍ता बँकेत जमा केला आहे. हंगामातील ऊसाला २,८०० रूपयाप्रमाणे ऊस बिले वर्ग झाली आहेत. उर्वरित १०० रूपयांचा जादा हप्‍ताही दिवाळीपूर्वी दिला जाणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगीतले. पुढील गळीत हंगामात संपूर्ण ऊस गळीतास पाठवून कारखान्‍याचे उद्दिष्‍ट पूर्ण करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कारखान्‍याचे संचालक मानसिंग पाटील, दत्‍तात्रय पाटणकर, बजरंग पाटील, खंडेराव घाटगे, चंद्रकांत खानविलकर, बंडोपंत कोटकर, जयसिंग ठाणेकर, गुलाबराव चव्‍हाण, प्रभाकर तावडे, बाजीराव पाटील, रविंद्र पाटील, उदय देसाई, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील, सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

1,317 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा