Breaking News

 

 

‘चौकीदार चोर है’बद्दल राहुल गांधींनी व्यक्त केली दिलगिरी…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर ‘चौकीदार चोर है’ या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) दिलगिरी व्यक्त केली आहे. आता सुप्रीम कोर्टदेखील म्हणत आहे की, चौकीदार चोर है, या राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात सुप्रीम कोर्टात भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी याचिका दाखल केली होती.

लेखी यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर आता सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली होती. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवत २२ एप्रिलपर्यंत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे.

‘निवडणुकीच्या धामधुमीत मी ते वक्तव्य केलं होतं. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो,’ असं स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिलं आहे. सुप्रीम कोर्टाने राफेलच्या कागदपत्रांवर निर्णय दिल्यानंतर राहुल गांधींनी केलेल्या टिप्पणीविरोधात भाजपने याचिका दाखल केली. मोदी हे चोर आहेत आणि त्यांनी अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी दिले, अशी टिप्पणीही राहुल गांधींनी केली होती. राहुल गांधींच्या या वक्तव्याला भाजपने जोरदार आक्षेप घेतला.

राहुल गांधींचं हे वक्तव्य खोटं आणि बदनामीकारक आहे, असं म्हणत निवडणूक आयोगाकडे भाजपने ही याचिका दाखल केली. राहुल गांधी हे नरेंद्र मोदींवर बिनबुडाचे आरोप करत आहेत, असं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं होतं.

1,173 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा