Breaking News

 

 

कोलंबो बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या २९० वर, ५०० जखमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेतील कोलंबोमध्ये रविवारी सकाळी आठ ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांतील मृतांचा आकडा २९० वर पोहोचला आहे. तर ५०० जण या स्फोटात जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच भारतीयांचाही समावेश आहे. या प्रकरणी नॅॅशनल तौहिद जमात या संघटनेच्या आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

कोलंबोत रविवारी ईस्टरच्या सणावेळी चार आलिशान हॉटेल्स आणि दोन चर्चमध्ये सकाळी ८.४५ वाजता दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला. दहशतवाद्यांनी एकूण आठ बॉम्बस्फोट घडवले. या स्फोटांमधील मृतांचा आकडा आज (सोमवारी) २९० वर पोहोचला. तर ५०० जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हल्ल्यात एकूण ३२ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात ब्रिटन, अमेरिका, टर्की (तुर्कस्तान), भारत, चीन, पोर्तूगीज आणि अन्य दोन देशांच्या नागरिकांचा समावेश आहे.

भारताच्या एकूण पाच नागरिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून श्रीलंकेतील भारतीय दूतावास स्थानिक यंत्रणांच्या संपर्कात आहे. श्रीलंकेतील पश्चिम भागात मशिदीवर पेट्रोल बॉम्ब हल्ला करण्यात आला. तर मुस्लीम व्यक्तींच्या दोन दुकानांवरही अज्ञातांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे.

शहरात ठिकठिकाणी सैन्याचे जवान तैनात होते. श्रीलंका सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने सोशल मिडीया आणि मेसेजिंग साईट्सवर निर्बंध आणले आहेत.

444 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा