Breaking News

 

 

‘वानखेडे’वरील आयपीएल सामन्यांवर प्रश्नचिन्ह !

मुंबई (प्रतिनिधी) : वानखेडे स्टेडियम वापराबाबतचा मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि सरकारमधील करार संपुष्टात आला आहे. स्टेडियमचा वापर सुरु ठेवण्यासाठी सरकारने १२० कोटी रुपयांची मागणी केली आहे. तशी नोटीसही पाठविण्यात आली आहे. यामुळे आयपीएलवरील पुढील सामन्यांवर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने करार नूतनीकरण, थकीत कर आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी एमसीएला नोटीस पाठविली आहे. ही नोटीस १६ एप्रिलला मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविली आहे. यामध्ये एमसीएकडून १२० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. जर ही रक्कम देण्यात आली नाही तर एमसीएला परिसर रिकामा करावा लागणार आहे. ३ मे पर्यंतची तारीख यासाठी देण्यात आली आहे.

१९७५ मध्ये राजकीय नेते एस.के.वानखेडे यांनी हे स्टेडियम बनविले होते. ४३,९७७.९३ चौ. मी मध्ये उभ्या असलेल्या या स्टेडियममध्ये एकावेळी ३३ हजार प्रेक्षक बसू शकतात. राज्य सरकारने ही जागा एमसीएला ५० वर्षांच्या करारावर दिली होती. हा करार गतवर्षी फेब्रुवारीमध्येच संपला आहे.

एमसीएने सांगितले की, करार नूतनीकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठविण्य़ात आला आहे. यामध्ये बाजारातील दरानुसार भाडे दिले जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या नोटीशीची आपल्याला कल्पना असल्याचे एमसीएचे सीईओ सी. एस. नाईक यांनी सांगितले.

762 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश