Breaking News

 

 

आयफेल टॉवरवरील दिवे मालवून कोलंबोतील मृतांना श्रद्धांजली

पॅरिस (वृत्तसंस्था) : आठ बॉम्बस्फोटांच्या मालिकेने हादरलेल्या श्रीलंकेतील कोलंबो शहरात शेकडो लोकांना जीव गमवावा लागला. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकले. दरम्यान, झालेल्या या घटनेनंतर रविवारी रात्री पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवरील रोषणाई बंद करून या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्याचबरोबर बिहारमधील बोधगया येथील आंतरराष्ट्रीय महाबोधी विहारात बौद्ध भिक्खूंनी या स्फोटांतील पीडितांसाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. रविवारी रात्री उशीरा आयोजित करण्यात आलेल्या या प्रार्थना सभेत बौद्ध भुक्खूंनी शांततेचे प्रतिक असलेला कॅण्डल मार्च काढला आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली.

261 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे