Breaking News

 

 

तब्बल ९ वर्षांनंतर अक्षय – कॅॅट येणार एकत्र !

मुंबई (प्रतिनिधी) : चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ उर्फ ‘कॅॅट’ झळकणार असल्याचे ट्विटरद्वारे कळवले आहे. चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्काच असणार आहे.

अक्षय कुमार आणि कतरिना बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या आधी कतरिना आणि अक्षय ‘वेलकम’, सिंग इज किंग, ‘दे दनादन, ‘नमस्ते लंडन’, ‘हमको दिवाना कर गये’, ‘तीसमारखाँँ’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे मागील महिन्यात दोन पोस्टर प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे काम करणार असल्याची चर्चा होती. परंतु आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. तसेच ‘सिम्बा’प्रमाणेच हा चित्रपटही पोलिसांवर आधारित असणार आहे.

528 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे