Breaking News

 

 

मतदान प्रक्रियेसाठी इलेक्ट्रॉनिक तंत्राचा पुरेपूर वापर : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकंणगले मतदार संघात निवडणूक प्रक्रिया अचूक, निर्भयपणे, सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासहार्ता ठेवून पार पडावी. यासाठी प्रशासनाने अत्याधुनिक तंत्राचा पुरेपूर वापर केला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

देशात पार पडलेल्या दोन टप्प्यातील मतदानामध्ये दोन ते तीन टक्के मतदान यंत्रे बिघडल्याचे दिसून आले. यामुळे जिल्ह्यात त्याची खबरदारी घेतली आहे. मशिन नादुरुस्त झाल्यास त्वरीत दुरुस्त करण्यासाठी प्रत्येक भागात चार इंजिनियर व सहाय्यक नेमले असून त्यांच्या वाहनावर जीपीएस यंत्रणा लावली आहे. याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दूरदर्शन संच ठेवून जिल्ह्यातील जास्तीतजास्त मतदान केंद्रातील स्क्रिनींग करुन ती थेट या दूरदर्शनवर दिसण्याची व्यवस्था केली आहे.

याबरोबरच मतदान केंद्रात ४०० सीसीटिव्ही कॅमेरे सीमकार्डसह लावण्यात येणार आहेत. याशिवाय मतदानयंत्र वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांनाही जीपीएस यंत्रणा लावण्यात येणार असून मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवला असून प्रत्यक्ष मतदान अधिकारी सीसीटिव्ही कॅमेरे, व्हिडीओग्राफर यांची सोय कऱण्यात आली आहे.

याशिवाय मतदान यंत्रे वाहतूक करणाऱ्या वाहनांबरोबर उमेदवारांच्या प्रतिनिधींना गोदामापर्यंत जाता येणार आहे. या गोदामावर चौवीस तास पहारा ठेवण्यात आला असून तहसिलदार आणि उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी दररोज दोनवेळा तपासणी करणार आहेत. तर सुरक्षिततेसाठी आठ तासांच्या शिप्टप्रमाणे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या गोदामामध्येही एकुण ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

405 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग