Breaking News

 

 

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघात २३ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान निर्भय व पारदर्शकपणे व्हावे यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना केली असल्याच माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई आणि नंदकुमार काटकर यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत एकुण ४,००४ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी कोल्हापूर मतदार संघात २,१४८ तर हातकणंगले मतदार संघात १,८५६ मतदान केंद्रे आहेत. कोल्हापूर मतदार संघात प्रत्येकी एक बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपीएटी मशीन तर हातकणंगले मतदार संघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट प्रमाणे ३,७१२ आणि कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपीएटी मशिन १,८५६ ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय राखीव मतदान यंत्रेही ठेवण्यात येणार आहेत.

सर्व संच उपलब्ध असून उद्या (सोमवार) सर्व मतदान अधिकारी आणि सहाय्यक मतदान केंद्रावर साहित्यांसह रवाना होणार आहेत. कोल्हापूर मतदार संघात १८ लाख ७४ हजार ३४५ तर हातकणंगले मतदार संघात १७ लाख ७२ हजार ५६३ इतके मतदार आहेत. या निवडणूकीत प्रामुख्याने दिव्यांग आणि अंध मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध केल्या असून यामध्ये व्हिलचेअर्स, वाहने, स्वंयसेवक, औषधे यांचा समावेश असून अंधासाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध केल्या आहेत.

मतदान झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे मतमोजणी केंद्रापर्यंत नेण्यासाठी ८६६ आणि ६४५ वाहने उपलब्ध केली आहेत. मतदानासाठी एकुण २० हजार ४४ इतके कर्मचारी नियुक्त केले आहेत.

जाहीर प्रचाराची वेळ संपली असल्याने आता जिल्ह्यातील मतदार सोडून निवडणूकीच्या संबंधाने कोल्हापूर जिल्ह्यात थांबलेल्या व्यक्तींनी त्वरीत जिल्ह्याबाहेर जावे, असे आदेश काढण्यात आले आहेत. या निवडणूकीची मतमोजणी २३ मे रोजी होणार असून कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमण मळा येथील धान्य गोदाम तर हातकंणले मतदार संघाची मतमोजणी राजाराम तलावाजवळील शासकीय गोदामात होणार असल्याचे दौलत देसाई यांनी सांगितले.

546 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश