Breaking News

 

 

जेट एअरवेजच्या साहाय्याला धावले मुकेश अंबानी !

मुंबई (प्रतिनिधी) : अब्जावधी रुपयांच्या कर्जाच्या गर्तेत बुडालेल्या जेट एअरवेजमधील अनेकांच्या नोकरीवर आर्थिक संकटामुळे टांगती तलवार आहे. एकीकडे बँकांनी जेटला तत्काळ आर्थिक मदत देण्यास नकार दिला असतानाच पुन्हा या कंपनीला नव्याने उभं करण्याचे प्रयत्नही दुसरीकडे सुरू आहेत. अखेर जेटच्या मदतीला उद्योगपती मुकेश अंबानी धावून आले असल्याचे वृत्त आहे.

रिलायन्स उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे जेटच्या शेअर्समध्ये भागीदारी घेण्याच्या निर्णयावर पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी कंपनीकडून कोणतीच अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, एतिहाद एअरवेजही जेट एअरवेजमध्ये भागीदार होण्यासाठी उत्सुक आहे. सध्याच्या त्यांच्याकडे २४ टक्के भागीदारी आहे. किंबहुना, संबंधित कंपनीकडून जेटमध्ये भागीदारीसाठीचं ईओआय सुद्धा दाखल करण्यात आलं आहे. या माध्यमातून अंबानी जेटसाठी तारणहार ठरु शकतात आणि या साऱ्यात एतिहादची जेटमधील भागीदारी ४९ टक्क्यांवर पोहोचेल.

जेटच्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी अर्थमंत्र्यांचीही भेट घेतली. जेटच्या सर्व कर्मचाऱ्यांना कमीत कमी एक महिन्याचं वेतन देण्यासाठी जवळपास १७० कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे आता या अडचणींचा सामना नेमका कसा केला जाणार याकडेच उद्योग विश्वाचे लक्ष लागले आहे.

1,278 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा