Breaking News

 

 

धनुष्यबाणाचे तुकडे तर कमळाबाई महाराष्ट्रात दिसणार नाही : धनंजय मुंडे

गारगोटी (प्रतिनिधी) : मोदी म्हणजे चौकीदार, उद्धव ठाकरे म्हणजे पहारेकरी… हे दोघेही चोर आहेत. अमित शहा म्हणजे अफजलखान असून त्यांचा अर्ज भरण्यासाठी ठाकरे लाचार होऊन गुजरातला गेले होते. आता निवडणुकीत धनुष्यबाणाचे तुकडे होणार असून कमळाबाई महाराष्ट्रात दिसणार नाही, अशी खरमरीत टीका  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. ते आज (शनिवार) गारगोटी येथे खा. धनंजय महाडिक यांच्या प्रचारसभेत केले.

खा. धनंजय महाडिक म्हणाले की, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आठ हजार कोटीची विकासकामे केली असून जनता मला विजय करील यात शंका नाही. माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले की, भुदरगड तालुक्यातून दहा हजारांचे मताधिक्य महाडिक यांना देऊ भाजप सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे.

या सभेत गोकुळचे संचालक धैर्यशील देसाई, प्रा. जालंदर पाटील, एकनाथ जठार, विश्वनाथ कुंभार, मुबारक भाई यांची भाषणे झाली. या वेळी धैर्यशील पाटील, जीवन पाटील, रणजित पाटील, दिनकर कांबळे,  पंडितराव केणे आदी उपस्थित होते. सुनील कांबळे यांनी आभार मानले.

948 total views, 18 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे