Breaking News

 

 

अखेर आ. अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

जालना (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे बंडाचे निशाण फडकवलेल्या काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खा. अशोक चव्हाण यांनी आज (शनिवार) जालन्याच्या सभेत सत्तार यांच्या हकालपट्टीची घोषणा केली आहे.

अब्दुल सत्तार यांनी आमदारकीबरोबरच जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची भूमिका जाहीर केली होती. तसेच ‘काँग्रेसने मला धोका दिला’ असं म्हणत सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच औरंगाबाद मतदारसंघामध्ये हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देत काँग्रेसच्या विरोधात प्रचार सुरु केला. यामुळे पक्षविरोधी कारवाया केल्याने सत्तर यांची पक्षातून हकालपट्टी करीत आहे, अशी घोषणा खा. अशोक चव्हाण यांनी जालन्याच्या सभेत केली.

402 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश