Breaking News

 

 

महाडिक परिवाराचा जीव ‘गोकुळ’मध्ये अडकलाय : हर्षल सुर्वे

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : महाडिक परिवाराचा जीव गोकुळमध्ये अडकलेला आहे. खुपिरे येथील सभेत महादेवराव महाडिक म्हणाले,  खासदारकी गेली तर गोकुळही जाईल म्हणजे त्यांना खासदारकी गोकुळसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे  त्यांना  आतापासूनच पराभव दिसू लागला असल्याचे प्रतिपादन आरोप युवा सेनेचे हर्षल सुर्वे यांनी केला. ते प्रा. संजय मंडलिक यांच्या नंदगाव (ता. करवीर) येथील प्रचार सभेत बोलत होते.

वीरेंद्र मंडलिक म्हणाले की, कोल्हापूरच्या जनतेला माहीत आहे की, कै. मंडलिकसाहेब यांचे घर असो की ऑफिस कोणते काम असो, ते कोणाला माघारी पाठवत नसतं. एवढी विकासकामे केली म्हणता तर साड्या, भांडी व पैसे वाटायची वेळ खासदारांवर का आली असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला.

सुनील मोदी म्हणाले की, महाडिकांचा ऱ्हास हा त्यांचा खासदारकीपासून सुरू होणार आहे. खासदारकी गेली की इथून पुढे महाडिक प्रवृत्ती हद्दपार होईल. आमचे दोन नेते आमदार सतेज पाटील व पुणे म्हाडा अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे या दोन्ही नेत्यांना आम्ही आता आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी व्ही डी साठे, एकनाथ पाटील, एम. ए. चौगुले, मारुती निगवे, विश्वास दिंडोर्ले, भगवान नरके, सनी नरके, संजय पाटील, शिवसैनिक उपस्थित होते.

1,821 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे