कोल्हापूर (प्रतीनिधी) :  अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माथाडी कामगारांचे दैवत कै. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीदिनी दि. २५ सप्टेंबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठा महासंघाच्या मंगळवार पेठ येथील कार्यालयात प्रतिमेचे पूजन, तसेच पदोन्नतीपदी निवड झालेल्या अधिकारी यांचा व यशस्वी युवा उद्योजकांचा सत्कार व रिक्षा चालकांच्या गुणी, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असा संयुक्त कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक हे असतील. अण्णासाहेबांच्या कालापासून कार्यरत असणारे लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष ऊर्फ बापूसो जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. कार्यकर्ते व नागरिकांनी मंगळवार पेठ येथील मराठा महासंघ कार्यालयात सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.