Breaking News

 

 

राहुल-पंड्याचे करण जोहरबरोबर चक्क २० लाखांचे कॉफीपान !

मुंबई (प्रतिनिधी) : स्टार वन उपग्रह वाहिनीवरील ‘कॉफी विथ करण’मध्ये या शोमध्ये महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि हार्दिक पंड्या यांना बीसीसीआयने प्रत्येकी वीस लाखांचा दंड ठोठावला आहे. यामुळे या दोघांना करण जोहरबरोबरचे कॉफीपान अत्यंत महागात पडल्याची चर्चा क्रिकेट विश्वात रंगली आहे.

सिने दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये महिलांविषयी राहुल आणि पंड्या यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली होती. या विधानांचा सर्व थरातून निषेध करण्यात आला होता. परिणामी बीसीसीआयने पंड्यावर दोन सामन्यांची बंदीही घातली होती. आज (शनिवार) बीसीसीआयने या दोघांनाही आर्थिक दंड ठोठावला आहे.

या दोघांना निमलष्करी दलाच्या १० शहीद जवानांच्या  कुटुंबांना मदत म्हणून प्रत्येकी १ लाख रूपये आणि अंध क्रिकेटपटूंच्या असोसिएशनला प्रत्येकी १० लाखांची रक्कम देण्याचेही आदेश दिले आहेत. ही रक्कम जमा करण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. जर ही रक्कम त्यांनी वेळेत जमा केली नाही तर त्यांच्या मॅच फीमधून ही रक्कम कापून घेण्यात येईल, असा इशाराही त्यांना देण्यात आला आहे.

522 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग