Breaking News

 

 

बहुमत मिळाल्यास कलम ३७० रद्द करणार : अमित शहा

वलसाड (वृत्तसंस्था) :  संसदेच्या दोन्ही सदनात भाजपला बहुमत मिळाल्यावर काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. ते गुजरातमधील वलसाडच्या धरमपूरमधील सभेत बोलत होते.

आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात कलम ३७० रद्द करण्याचा उल्लेख आहे. संसदेत दोन्ही सदनात बहुमत मिळाल्यावर कलम ३७० रद्द करण्यात येईल. त्यामुळे जम्मू काश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग बनणार आहे. या राज्याला देशापासून वेगळेपण देणारे हे कलम रद्द करून राज्याला देशाच्या मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या निवडणुकीत विकासासोबतच राष्ट्रीय सुरक्षा हा प्रमुख मुद्दा असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात विकास झाला आहे. देशाचा विकास करण्यासह देशाला सुरक्षा देण्याचे काम फक्त नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच करू शकते, असे ते म्हणाले. फक्त नरेंद्र मोदीच हिंदुस्थानला महाशक्ती बनवू शकतात, त्यामुळे जनतेने मजबूत सरकार निवडून द्यावे, असे आवाहनही शहा यांनी केले. जवानांच्या शौर्याचे पुरावे मागणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

492 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा