Breaking News

 

 

‘बजाज’कडून ‘नॅनो’पेक्षा लहान कार बाजारात !

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या दारासमोर स्वतःची कार असणे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. टाटा मोटर्सने मध्यमवर्गीयांसाठी सर्वांत स्वस्त ‘नॅनो’ कार बाजारात आणली होती. त्याला प्रारंभी प्रतिसादही मिळाला होता. आता दुचाकी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या बजाज ऑटोने महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या बाजारपेठेत नॅनोपेक्षाही लहान कार आणली आहे. या कारची किंमत २.४८ लाख इतकी आहे.

बजाज ऑटोने मध्यमवर्गीय ग्राहक डोळ्यांसमोर ठेवून या छोट्या कारची निर्मिती केली आहे. या कारचे नाव ‘क्यूट क्वॉड्रिसाइकल’ (Qute Quadricycle) असे आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही प्रकारच्या इंधनावर चालू शकते. पेट्रोलवर चालणाऱ्या कारची किंमत २.४८ लाख तर सीएनजी कारची किंमत २.७८ लाख आहे. एकावेळी चार लोक या गाडीमधून प्रवास करू शकतात.

या कारमध्ये २१६ सीसी ट्विन स्पार्क डीटीएसआय इतक्या क्षमतेचे इंजीन आहे. ही कार ७० किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते. या गाडीचे इंजीन इतर चारचाकी गाड्यांच्या तुलनेने लहान असल्यामुळे ती केवळ ३५ किलोमीटर अॅव्हरेज देऊ शकते. या गाडीची लांबी केवळ २ हजार ७५२ एमएम, रुंदी १ हजार ३१२,  उंची १ हजार ६२२ एमएम आहे.

2,622 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *