Breaking News

 

 

धामणी प्रकल्पासाठी मतदानावर बहिष्कारच : वेतवडे ग्रामसभेत ठराव

कळे (प्रतिनिधी) : मागील २० वर्षापासून रखडलेला राई (ता. राधानगरी)येथील धामणी प्रकल्प पुर्णतेसाठी धामणी खोऱ्यातील ३० हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. धामणी खोऱ्यातील जनतेला आपल्या संपूर्ण बहिष्काराचे महत्त्व पट लागले आहे. वेतवडे (ता.पन्हाळा) येथे हनुमान जयंती दिनी ग्रामसभेत  सर्व ग्रामस्थांनी धामणी प्रकल्पाच्या कामास सुरुवात होत नाही तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणूकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत आहे.

यावेळी दिनकर पाटील, केरबा पाटील, के.डी.पाटील, अनिल सुतार, सरपंच भिकाजी दळवी,एम बी पाटील, विलास पाटील ,संभाजी पाटील, जयसिंग पाटील, रघुनाथ पाटील, बाजीराव पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. 

1,017 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे